LOKSANDESH NEWS
शेगाव बस स्थानकासमोरील दोन वाहने अज्ञाताने जाळली
दुसऱ्या दिवशीच्या नंबर साठी बस स्थानकासमोर उभ्या करून ठेवलेल्या दोन काळी पिवळी मॅजिक वाहनांना अज्ञात इसमाने आज पहाटेच्या सुमारास आग लावून पेटवून दिले. या घटनेत दोन्ही वाहने जळून खाक झाली आहेत.
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील बसस्थानकासमोर मंगळवारी रात्री दोन जणांनी आपली काळी पिवळी (मॅजिक) प्रवासी वाहने दुसऱ्या दिवशीच्या नंबर साठी रस्त्याच्या कडेला उभी करून ठेवली होती. या वाहनांना आज बुधवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात इसमाने पेटवून दिले.
या घटनेमध्ये दोन्ही वाहने पूर्णतः जळून खाक झाली. कुटुंबाचे उदरनिर्वाह चालविण्यासाठी ज्ञानेश्वर लिप्ते आणि इमरान खान या प्रवासी वाहन चालविणाऱ्या चालकांवर आता बेरोजगारीची कुऱ्हाड चालली आहे.
मागील काही दिवसांपासून बस स्थानक परिसरात चोऱ्या आणि विविध अवैध व्यवसायांना ऊत आले आहे. त्याचाच हा परिपाक असल्याची प्रतिक्रिया या भागातील नागरिक व्यक्त करीत आहेत.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली