राष्ट्रवादीचा पुन्हा पक्षप्रवेश सोहळा 11 मे रोजी पार पडणार, आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांची माहिती
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे 11 मे रोजी नांदेड जिल्ह्यात आहेत. मुखेड तालुक्यातील बनाळी येथे अजित पवार यांच्या उपस्थितीत अनेकांचे पक्ष प्रवेश होणार आहेत, अशी माहिती आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी पत्रकार परिषद दिली. आमदार चिखलीकर म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली जय शिवशंकर कारखान्याचे माजी अध्यक्ष उदय चव्हाण व त्यांचे सहकारी राष्ट्रवादीत पक्षप्रवेश करणार आहेत.
यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, रूपाली चाकणकर यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक नेते यावेळी उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची सदस्य नोंदणी 90 हजार नोंदणी झाली असून, येत्या काही दिवसात हा आकडा आणखी वाढणार असे देखील आमदार प्रताप पाटील चिखलीकर म्हणाले.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली