LOKSANDESH NEWS
मटक्याचा धंदा सुरळीत सुरू ठेवण्यासाठी 25 हजाराची लाच घेतांना पोलीस उपनिरीक्षकांसह कॉन्स्टेबल जेरबंद
मटक्याचा धंदा सुरळीत सुरू ठेवण्यासाठी 25 हजाराची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षकांसह कॉन्स्टेबलला अटक करण्यात आली आहे. परशुराम पवार असं पकडण्यात आलेल्या उपनिरीक्षकाचं नाव असून, लक्ष्मण शिंदे असं कॉन्स्टेबलचं नाव आहे. नंदुरबार अँटी करप्शन विभागानं ही कारवाई केली. पकडलेला लाचखोर पोलीस उपनिरीक्षक आणि कॉन्स्टेबल हे तालुका जालना पोलीस ठाण्यात कार्यरत होते. दरम्यान या कारवाईमुळे जालन्याच्या पोलीस दलात एकच खळबळ उडाली असून, मटक्याच्या व्यवसायाला पोलिसांचा आशीर्वाद असल्याचं अधोरेखित झाल आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली