जिंदाल कंपनीच्या आगीला 36 तास उलटूनही आग नियंत्रणात नाही
इगतपुरी तालुक्यातील मुंडेगाव परिसरातील जिंदाल कंपनीच्या आगीला 36 तास उलटून देखील आग नियंत्रणात आलेली नाही.कंपनीचे मेटालायझर युनिट 1,2,3 आणि पोलिस्टर लाईन ABCD पुंर्णपणे जळाले असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. फिल्म्स आणि पीव्हीसी मटेरियल हे ज्वलनशील असल्याने ही आग वाढत जात असल्याचे सांगितले जात आहे.
काल पासून नाशिक, ठाणे, छत्रपती संभाजी नगर या जिल्ह्यातून अग्नीशमन दलाच्या 20 गाड्या तसेच NDRF ची टीम घटनास्थळी दाखल झाली असून फोम आणि आगीच्या साहाय्याने आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. आकाशात आगीच्या धुराचे लोट मोठ्या प्रमाणात पसरले असून आगीची तीव्रता वाढत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून एक किमीचा परिसर रिकामा करण्यात आला असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. अजूनही ही आग दोन ते तीन दिवस अशीच राहणार असल्याचे सांगण्यात येत असून प्रशासन आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी काय उपाययोजना योजना करते हे महत्वाचे ठरणार आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली