म्हेत्रेंनी फक्त राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी पक्षप्रवेशाचा निर्णय घेतला आहे - सचिन कल्याणशेट्टी

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

म्हेत्रेंनी फक्त राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी पक्षप्रवेशाचा निर्णय घेतला आहे - सचिन कल्याणशेट्टी


 म्हेत्रेंनी फक्त राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी पक्षप्रवेशाचा निर्णय घेतला आहे - सचिन कल्याणशेट्टी


ऑन काँग्रेस नेते सिद्धाराम म्हेत्रे प्रवेश

- माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचं महायुती स्वागत करतो.

- काँग्रेस सत्तेपासून बरीच लांब गेली आहे त्यामुळे सिद्धाराम म्हेत्रे राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी शिवसेनेत प्रवेश करतंय.

- शिवसेना ही हिंदुत्ववादी आहे आणि म्हेत्रेंनी हिंदुत्व विचाराचा विरोध केला आहे. त्यामुळे त्यांनी हिंदुत्व विचारसरणी स्वीकारली तर त्यांचा स्वागत.

- सोलापूर स्थानिक स्वराज्य निवडणुकीत स्थानिक नेत्यांना तो अधिकार दिला जातो.

- पक्षाचा जो आदेश येईल आणि जिल्ह्यातील नेते मंडळी यांच्याशी बोलून आम्ही मार्ग काढू

ऑन म्हेत्रे कार्यकर्ते खोटे गुन्हे

- सिद्धाराम म्हेत्रे यांच्या कार्यकर्त्यांवर एक खोटा गुन्हा दाखल केला आहे त्यांनी दाखवावं

- फक्त म्हेत्रे सांगतात आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले

- फक्त राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी पक्षप्रवेशाचा निर्णय घेतला आहे

- काँग्रेसचा अस्तित्व राहिले नाही,त्यांनी हा निर्णय घेताना लोकांना सांगायला पाहिजे होतं.

ऑन पक्षप्रवेश स्वागत

- म्हेत्रेंचं आमंत्रण आलं तर मी त्याचा विचार करेल

- पण मी 24 तारखेपासून बाहेर असणार आहे

- उपमुख्यमंत्री शिंदे हे आमचे नेते आहेत त्यादिवशी जर मी गावात असेल तर स्वागतासाठी जाणार

- म्हेत्रेंच्या तालमीत मी तयार झालो आहे असं त्यांनी एकदा मला सांगावं

- माझे नेते देवेंद्र फडणवीस आहे आणि मी त्यांच्या तालमीत तयार झालो आहे.

- मी माझ्या पक्षाच्या तालमीत तयार झालो आहे मी असलं कुणाच्याही तालमीत तयार झालो नाही.

ऑन अक्कलकोट अवैध धंदे

- अक्कलकोटचे आमदार असताना मी यांचे अवैध धंदे बंद पडले.

- अक्कलकोट तालुक्यातील अवैध धंदे पुन्हा सुरू करण्यासाठी महायुतीत प्रवेश करत असतील तर ते मान्य नसणार आहे.

 ऑन अक्कलकोट भाजप

- म्हेत्रे यांच्या प्रवेशामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांचा भावना दुखवण्याच कारण नाही.आमचा विरोधक काँग्रेस आहे.

- ज्या काँग्रेसच्या झाडा वाढले, त्याचा मूळ सोडून येत असतील तर त्यांचं स्वागत आहे.

ऑन महायुती स्थानिक स्वराज्य निवडणूक

- स्थानिक स्वराज्य निवडणुकीत महायुती बाबतीत त्या वेळेचा तो निर्णय असेल.

- म्हेत्रेंचा पक्षप्रवेश करताना शिंदे यांच्या घरी गेले नव्हते ते शिंदे यांच्या घरी गेले असतील.



लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली