शहरातील 983 धोकादायक ईमारतीच्या मालकांना ईमारत खाली करण्यासाठी सार्वजनिक नोटीस
जालना शहरात तब्बल 983 धोकादायक आणि मोडकळीस आलेल्या ईमारतीच्या मालकांना महापालिकेने सार्वजनिक नोटीस बजावली. शहरात 983 धोकादायक ईमारती आहेत. सलग दोन वर्षांपासून वारंवार सांगूनही ईमारतींचे मालक ईमारती खाली करायला तयार नाहीत.
त्यामुळे पावसाळयात ईमारती कोसळण्याच्या संभाव्य धोका लक्षात घेता, महापालिकेने वर्तमानपत्रात जाहिरात देऊन सार्वजनिक नोटीस बजावल्याची माहिती महापालिका आयुक्त संतोष खांडेकर यांनी दिली आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.