मृतक शुभांगी तावडेच्या कुटुंबाची यशोमती ठाकूर यांनी घेतली सांत्वनपर भेट
अमरावती शहरातील जय भोले कॉलनी मध्ये राहत असलेल्या व आरोग्य विभागात कम्युनिटी हेल्थ ऑफिसर या पदावर कार्यरत असलेल्या शुभांगी तायवाडे या महिलेने पती व सासरच्या लोकांच्या जाजाला कंटाळून 4 दिवसांपूर्वी गळफास लावून आत्महत्या केली होती. मात्र मृतक शुभांगीला एक 3 वर्षाची मुलगी व एक 11 महिन्याची मुलगी आहे. शुभांगीच्या मृत्यूने दोन्ही मुली ह्या पोरक्या झाल्या आहे. कारण आई मृत पावली तर वडील पोलीस स्टेशनच्या जेलमध्ये बंद आहे. अमरावतीतील बेलपुरामध्ये मृतक शुभांगीच्या आई वडील बहिण व लहान मुलींच सांत्वन करण्यासाठी माजी मंत्री काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर गेल्या होत्या,
यावेळी शुभांगींच्या आई वडील व बहीण भाऊ यांची यशोमती ठाकूर यांनी विचारपूस करत त्यांना एक धीर दिला, फरार झालेल्या दोन लोकांना पोलिसांनी तातडीने अटक केली पाहिजे, तसेच मृतक शुभांगीच्या गुन्हेकरांना कडक शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केली, तर राज्य महिला आयोगाने विभागीय स्तरावर महिला बाबतच्या सुनावण्या घेतल्या पाहिजे अशी मागणी देखील यशोमती ठाकूर यांनी केली. शुभांगीच्या मृत्यू प्रकरणात शुभांगीचे पती, सासू व नंनंद या तिघांना पोलिसांनी अटक केली, त्यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणात अद्याप दोघेजण फरार आहेत.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.