LOKSANDESH NEWS
खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचा शुभारंभ
ग्रुप ग्रामपंचायत वासांबे मोहोपाडा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे आणि स्थानिक आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ग्रुप ग्रामपंचायत कार्यालयाचे नूतनिकरण देखील करण्यात आले असून, कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच ग्रामपंचायत हद्दीत सोलर पथदिवे बसविण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत दिव्यांगांसाठी घरघंटी वाटप, ग्रामपंचायत हद्दीत पिशवी वाटप आणि वासांबे ग्रामपंचायतिच्या माजी सरपंच सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास ग्रुप ग्रामपंचाय सरपंच उमा मुंढे, उपसरपंच भुषण पारंगे आणि सदस्य उपस्थित होते.