मुख्य वनसंवरक्षक कार्यालयासमोर अनुकंप धारकांचे अन्नत्याग आंदोलन सुरू
अमरावती येथील मुख्य वनसंवरक्षक कार्यालयासमोर अनुकंप धारकांनी बेमुदत आमरण उपोषण व अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.
अमरावती जिल्ह्यातील ११ अनुकंप धारकांनी हे आंदोलन छेडले असून, गेल्या अनेक वर्षांपासून शासनाकडून फसव्या आश्वासनांची मालिका सुरू असल्याचा त्यांचा आरोप आहे. वारंवार निवेदने दिल्यानंतरही अद्याप त्यांना शासकीय सेवेत समाविष्ट करण्यात आलेले नाही. आंदोलकांचे म्हणणे आहे की, त्यांच्या पालकांचा मृत्यू शासकीय सेवेत झाला असून, नियमानुसार त्यांना सेवा मिळणे अपेक्षित आहे. मात्र, प्रशासनाकडून सतत दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे वैतागून त्यांनी आता उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. आता जोपर्यंत आम्हाला शासकीय सेवेत घेतले जात नाही, तोपर्यंत हे आंदोलन थांबवणार नाही असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली