LOKSANDESH NEWS
छगन भुजबळांना मंत्रिपद, समता परिषदेतर्फे पेढे वाटून जल्लोष
छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळेल की नाही? या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. महायुतीच्या सरकारमध्ये ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राज्यभरामध्ये राष्ट्रवादी पक्षाकडून तसेच समता परिषदेकडून जल्लोष साजरा करण्यात आला.
आज छत्रपती संभाजी नगर शहरातील क्रांती चौक येथे पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून फटाके फोडून, पेढे वाटून जल्लोष साजरा करण्यात आला. महायुती सरकार हे ओबीसीच्या मतावर निवडून आले, असे मत समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष मनोज घोडके यांनी व्यक्त केले.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली