जालना महापालिका मोकाट कुत्र्यांची करते कागदोपत्री नसबंदी

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

जालना महापालिका मोकाट कुत्र्यांची करते कागदोपत्री नसबंदी

                           

                               जालना महापालिका मोकाट कुत्र्यांची करते कागदोपत्री नसबंदी 


 जालना महानगरपालिकेच्या गलथान कारभारांमुळे आज एका ८ वर्षाच्या मुलीचा मोकाट कुत्र्यांनी चावा घेतल्यानं हकनाक बळी गेला आहे. या घटनेला सर्वस्वी महापालिका जबाबदार असून, याआधी दोन लहान मुलांचे मोकाट कुत्र्यांनी बळी घेतल्यांचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते अजित कोठारी यांनी केला आहे. ८ वर्षाच्या मुलीच्या मृत्यूप्रकरणी महापालिका आयुक्तांसह स्वच्छता निरीक्षक तसेच जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, 

अशी मागणी अजित कोठारी यांनी केली आहे. विशेष म्हणजे जालना शहरात मोकाट कुत्र्यांची नसबंदी करण्यासाठी महापालिका दरवर्षी २० लाख रुपये खर्च करते. मात्र माहिती अधिकारात हा खर्च देण्यास महापालिकेने नकार दिला असून, महापालिका अधिकारी ही माहिती लपवत असल्याचा आरोप कोठारी यांनी केला. तसेच बाहेरच्या जिल्ह्यातील कुत्रेही शहरात आणून सोडल्यानं शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली असल्याचं कोठारी यांनी म्हटलं आहे.



लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली