उद्यानांमधील लहान मुलांची खेळणी मोडक्या अवस्थेत असल्याने आम आदमी पार्टीच्या वतीने लक्षवेधी आंदोलन

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

उद्यानांमधील लहान मुलांची खेळणी मोडक्या अवस्थेत असल्याने आम आदमी पार्टीच्या वतीने लक्षवेधी आंदोलन

LOKSANDESH  NEWS 



उद्यानांमधील लहान मुलांची खेळणी मोडक्या अवस्थेत असल्याने आम आदमी पार्टीच्या वतीने लक्षवेधी आंदोलन


कोल्हापूर शहरातील महापालिकेच्या अनेक गजबजलेल्या उद्यानांमधील लहान मुलांची खेळणी मोडलेल्या अवस्थेत आहेत. प्रचंड दुरावस्था झाल्यामुळे ही खेळणी लहानग्यांसाठी धोकादायक देखील बनलेली आहेत. त्यामुळेच आम आदमी पार्टीच्या वतीने महापालिकेसमोर लक्षवेधी आंदोलन करण्यात आलं. 

यावेळी उद्यानातील लहान मुलांची खेळणी प्रतिकात्मक स्वरुपात महापालिकेसमोर रस्त्यावर मांडून या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आलं. तसेच या प्रतिकात्मक आंदोलनात लहान मुलांना त्या खेळण्यांवर खेळवून महापालिकेचा निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी प्रशासना विरोधात जोरदार घोषणाबाजी करत महापालिका परिसर दणाणून सोडण्यात आला. तर महापालिका प्रशासनाने तातडीने उद्यानांमधील खेळणी न बदलल्यास अधिकाऱ्यांच्या घरासमोरच अशी खेळणी मांडून आंदोलनाचा इशारा आपच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.


लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.