नागपूर विमानतळावरून प्रवाशाच्या बॅगेतून दोन बंदुकीचे काडतुसे जप्त, एकाला सोनेगाव पोलिसांकडून अटक
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून मुंबईसाठी जात असलेल्या प्रवाश्याच्या बॅगेतून काडतुस मिळून आली आहे इरफान खान सरदार खान हा मुंबईला जात असलेल्या प्रवाश्याचे नाव आहे.
- मुंबईला जाणाऱ्या इरफानची सुरक्षा यंत्रणेकडून बॅग तपासली असता त्याचा बॅगेतून दोन काडतुस मिळून आली. यावेळी त्याला विचारपूस केल्यावर काडतूस कुठून आणलेत याच उत्तर न दिल्यान याची माहिती पोलिसांना देण्यात आली
- यानंतर सोनेगाव पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करत अटक केली. न्यायालयात हजर करून एक दिवसाचा पीसीआर घेऊ चौकशीला सुरवात केली. मात्र काडतूस नेमक्या कुठून आल्या या संदर्भात ठोस माहिती अद्याप मिळाली नाही.उडवा उडवी उत्तर दिल्यानं त्याच्याकडून तपास सुरू आहे.