केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची केली पाहणी

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची केली पाहणी

LOKSANDESH  NEWS 


             केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची केली पाहणी


 रावेर लोकसभा अंतर्गत  पाळधी (जामनेर) येथे अवकाळी पाऊस व वादळी वारे यामुळे झालेल्या नुकसानीची केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी पाहणी केली.

रावेर लोकसभा अंतर्गत मौजे पाळधी (जामनेर) येथे अवकाळी पाऊस व वादळी वारे यामुळे येथील केळी व पपई फळ बागांचे नुकसान झालेले असून आज सदर नुकसानीची केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली व शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळणे बाबत संबंधित अधिकारी यांना योग्य त्या सूचना केल्या.

यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्यासह भाजपा पदाधिकारी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, महसूल अधिकारी, स्थानिक ग्रामस्थ व शेतकरी सोबत उपस्थित होते.


लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली