चोपडा तालुक्यात बदलत्या वातावरणामुळे उन्हाळी मुग कापून गोळा करण्यासाठी शेतकऱ्याची धडपड
गेल्या आठवड्यात महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस व गारपीट झाली. चोपडा तालुक्यात देखील काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांचे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. सध्या उन्हाळी मूंग काढणीला आलेले आहे. हवामान खात्याने १२ तारखेपासून पुढील काही दिवस महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे शेतातील काढणीला आलेले शेती पीक काढण्यासाठी शेतकरी धडपड करत आहे.
चोपडा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर उन्हाळी मूग पेरणी केली जाते. मे महिना सुरू आहे, आता मुग काढणीला आलेला असल्याने शेतकरी मजुरांच्या साह्याने मुग कापून गोळा करीत आहे. वातावरण चांगलं व ऊन पडत असेल, तरच मशीनच्या सहाय्याने काढणी केली जाईल. जर का अवकाळी पाऊस पडला तर गोळा केलेला हा मुग ओला होईल, व त्याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होईल. मार्केटला विक्रीला घेऊन जाये पर्यंत उत्पन्न किती येईल याचे अंदाज सांगता येणार नाही. असे शेतकऱ्यांनी सांगितले.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली.