चोपडा तालुक्यात बोरमडी येथील आदिवासी महिलेची रस्त्यातच प्रसूती झाल्याची घटना

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

चोपडा तालुक्यात बोरमडी येथील आदिवासी महिलेची रस्त्यातच प्रसूती झाल्याची घटना

                                                            LOKSANDESH  NEWS 




               चोपडा तालुक्यात बोरमडी येथील आदिवासी महिलेची रस्त्यातच प्रसूती झाल्याची घटना 


 जळगावच्या चोपडा तालुक्यात बोरमडी येथील आदिवासी महिलेची रस्त्यातच प्रसूती झाल्याची घटना समोर आली आहे. तब्बल अर्धातास फोन करून सुद्धा रुग्णवाहिका आली नाही, त्यामुळे महिलेला तिचे पती दुचाकीवरून रुग्णालयात घेऊन जात असताना रस्त्यादस्ती प्रस्तुती झाल्याची घटना घडली आहे.बोरमडी येथील आदिवासी महिलेला प्रसूती कळा सुरू झाल्या यासाठी तिच्या कुटुंबीयांनी रुग्णवाहिकेला फोन केला, मात्र रुग्णवाहिका आलीच नाही. शेवटी प्रसूती कळा वाढल्याने तिचे पतीने तिला दुचाकीवरून रुग्णालयात घेऊन जात असताना ती रस्त्यातच प्रसूती झाली, तिने बाळाला जन्म दिला.

यावेळी चक्क या ठिकाणच्या इतर महिलांनी प्रसूती करताना साहित्य नसल्याने चक्क दगडाच्या सहाय्याने नाळ तोडल्याचा दुर्दैवी प्रकार घडला.केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांचा चोपडा हा मतदार संघ आहे तर दुसरीकडे जिल्ह्यात तीन कॅबिनेट मंत्री असताना महिलेला अशा पद्धतीने प्रसूती होण्याची वेळ आली असेल तर यापेक्षा वाईट ते काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. आदिवासी महिलांच्या अशा पद्धतीच्या प्रसूती बद्दल आदिवासी नेत्या प्रतिभा शिंदे यांनी सरकारवर मोठा संताप व्यक्त केला आहे.या ठिकाणच्या सर्व डॉक्टर्स आशा वर्कर , पारिचारिका या सर्वांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी प्रतिभा शिंदे यांनी केली आहे.


लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.