झाडाखाली प्रवासी वाहन दबले, सुदैवाने जीवितहानी टळली
मंगळवारी सायंकाळपासून शेगाव तालुक्यात मुसळधार पावसासह सुसाट वाऱ्याने हजेरी लावली. यामुळे या भागात अनेक झाडे उन्मळून पडली. यामुळे तालुक्याला जोडणाऱ्या रस्त्यांवर वाहतूक विस्कळीत झाल्याचे पहावयास मिळाले. आज सकाळपर्यंत अनेक ठिकाणी रस्त्यावर पडलेली झाडे हटवण्याचे काम सुरू होते. दरम्यान, शेगाव वरून पातुर्डा या गावाकडे जाणारी काडीपिणी मॅक्झिमो प्रवासी वाहन जोरात सुरू झालेल्या पावसामुळे रस्त्याच्या कडेला थांबली होती.
या ठिकाणी वाहन चालक पंचर दृष्टीने काम करीत असताना अचानकपणे बाजूला असलेले मोठे झाड या वाहनावर कोसळले. याच दरम्यान पातोडा गावाकडे जाणारे मोटरसायकल वरील एक जोडपेही याच वाहनाच्या बाजूला आपली मोटरसायकल उभी करून बाजूला सरकताच या मोटरसायकलवरही झाड कोसळले, त्यामध्ये थोडक्यात बचावले आहे.