LOKSANDESH NEWS
जीवाची बाजी लावणाऱ्या जवानांचा आणि त्यांच्या कुटुंबीयांचा अपमान करणं हे भाजपच्या राजकीय संस्कृतीचे लक्षण- जयश्री शेळके
कर्नल सोफिया कुरैशी या दहशतवाद्यांची बहीण आहे" असं विधान मध्यप्रदेशच्या विजय शाह या भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्याने केलंय. त्यापाठोपाठ समाजवादी पक्षाच्या रामगोपाल यादव यांनीही विंग कमांडर व्योमिका सिंग यांच्याबद्दल जातवाचक, अवमानकारक विधान केले आहे.
हा संपूर्ण भारतीय सेनेचा आणि देशाच्या सन्मानाचा अवमान आहे. कर्नल सोफिया कुरैशी या आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांच्या कर्तृत्वावर संपूर्ण देशाला अभिमान आहे. असे विधान म्हणजे देशाच्या सुरक्षेसाठी जीवाची बाजी लावणाऱ्या प्रत्येक जवानांचा आणि त्यांच्या कुटुंबीयांचा अपमान करणं आहे. भाजपच्या राजकीय संस्कृतीचे हे लक्षण आहे. मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंगसारख्या दहशतवादी व्यक्तीला संसदेत नेणाऱ्या भाजपाचा खरा चेहरा लोकांसमोर आलेला आहे.हमारी बहनो का अपमान! नही सहेगा हिंदुस्तान.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली