एमबीबीएस विद्यार्थ्याचा अनोखा उपक्रम, 200 पुस्तके दिनबंधू वाचनालयाला भेट, विद्यार्थ्यांनी जुनी पुस्तके देत उभारली ज्ञानसाखळी
तुषार आचले हे सध्या एमबीबीएस शिक्षण मुंबई येथे घेत आहेत. शिक्षणाचा प्रवास करताना त्यांनी वापरलेली जवळपास 200 हून अधिक पुस्तके बायोलॉजी, केमिस्ट्री, फिजिक्स तसेच NEET आणि JEE परीक्षांसाठी उपयुक्त मार्गदर्शक त्यांनी वाचनालयाला भेट दिली आहे. या उपक्रमामागे त्यांचा हेतू स्पष्ट आहे "मी जसा शिकून पुढे जात आहे, तसेच माझ्यासारखे अनेक विद्यार्थी घडावेत आणि ज्ञानाचा लाभ घ्यावा.
" या विचाराने प्रेरित होऊन त्यांनी ही पुस्तके देण्याचा निर्णय घेतला. या उपक्रमामुळे अनेक गरजू आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोलाची मदत होणार आहे. वाचनालयामध्ये या पुस्तकांमुळे एक नवा ज्ञानसाठा उपलब्ध झाला असून, भविष्यात अशाच उपक्रमांनी विद्यार्थ्यांनी एकमेकांना सहकार्य करावं, असं आवाहन त्यांनी केलं आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली