पाचोरा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; पाकिस्तानचा पुतळा जाळत तीव्र निषेध
पाचोरा येथे जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे हिंदू पर्यटकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आज पाचोरा शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. हा बंद विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, आणि सकल हिंदू समाजाच्या वतीने पुकारण्यात आला होता. व्यापारी, दुकानदार आणि नागरिकांनी या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
सकाळी १० वाजता जारगांव चौफुलीपासून छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत भव्य जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात "पाकिस्तानी आतंकवाद मुर्दाबाद", "पाकिस्तान मुर्दाबाद" अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पाहायला मिळाले.
मोर्चाच्या समारोपस्थळी सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यानंतर पाकिस्तानचा पुतळा जाळून दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. या प्रसंगी शहरातील विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण मोर्चा शांततेत पार पडला असून पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली