LOKSANDESH NEWS
डोंबिवलीतील सांगाव परिसरात नळांमधून शेवाळयुक्त दूषित पाणी; स्वच्छ पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी
डोंबिवली शहरात पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न उफाळून आला आहे. सांगाव परिसरात नळांमधून चक्क शेवाळयुक्त दूषित पाणी येत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मनसेच्या स्थानिक विभागप्रमुखांनी या पाण्याचा व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल करत पालिकेवर जोरदार टीका केली आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, तातडीने स्वच्छ पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी करण्यात येत आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.