पनवेल पालिकेचा नालेसफाईमध्ये हलगर्जीपणा; शिवसेनेचे पदाधिकारी आक्रमक तर एकनाथ शिंदेंकडे करणार तक्रार
मुसळधार पावसाचा फटका हा पनवेलमधील नागरिकांना देखील बसलेला आहे. कळंबोली, कामोठे परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी भरलं होतं. त्यामुळे पनवेल पालिकेच्या नालेसफाईची पोलखोल समोर आली. पालिकेने पावसा पूर्वी काम केली नसल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला. त्यामुळे आता पनवेल पालिकेच्या विरोधात शिवसेना पदाधिकारी आक्रमक झाले आहेत.
पालिकेने फक्त आश्वासन दिले, अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे रहिवासीयांचा जीव धोक्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा अशा प्रकारे पूरस्थिती परिस्थिती उद्भवू नये म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार करून निवेदन देणार असल्याचं शिवसेना पनवेल जिल्हाध्यक्ष रामदास शेवाळे यांनी म्हटलं. तसेच पनवेल पालिकेच्या हलगर्जीपणामुळे रहिवासीयांना फटका बसत असून पालिकेच्या कामाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे.