LOKSANDESH NEWS
हरियाणा राज्यातील महागडी स्कॉच महाराष्ट्रात विक्रीसाठी आणलेल्या आरोपींना राज्य उत्पादन शुल्क पथकाने केली अटक
पुष्पा स्टाईल हरियाणा राज्यातील विदेशी मद्य अवैध रित्या महाराष्ट्रात विक्रीसाठी आलेल्या आरोपींना गुप्तचर माहितीनुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाने अटक केली असून, अटक केलेल्या आरोपींकडून २५ लाखाहून अधिकचा मुद्देमाल जप्त केला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केलेली असून, ठाणे जिल्ह्यात या आधीही गोवा, दिसू दमन इथून अवैध्य रित्या विक्रीस आणलेल्या मद्यावर कारवाई केली आहे. अनेक वेळा महाराष्ट्रापेक्षा स्वस्त असणारे महागडे मद्य अवैध रित्या महाराष्ट्र आणून सर्रास विकली जात असल्याच्या प्रकरणात वाढ झाली होती.
यामुळे महाराष्ट्र शासनाच्या महसुलात मोठ्या प्रमाणात फटका बसत असल्याचे उघडकीस आले होते. हाच शासनाचा महसूल बुडू नये यासाठी महाराष्ट्र्र राज्य उत्पादन शुल्काचे पथक तैनात असून, मागील वर्षभरात तब्बल ३० हजार बल्क लिटर विदेशी तसेच देशी बनावटीचे मद्य ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केले आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र शासनाचा महसूल वाचविण्यात यश आले आहे. या मद्याची एकूण किंमत १४ ते १५ कोटी आहे. सध्या हरियाणा मधून अवैधरित्या मद्य विक्रीस आलेल्या २ आरोपींना अटक केली असून, पुढील तपस राज्य उत्पादन शुल्क विभाग करत आहेत.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली