नवी मुंबई पोलिसांची रात्रीची गस्त वाढली, कोंबींग ऑपरेशन सक्रीय
मागील काही दिवसांपासून वाढलेली गुन्हेगारी आणि परदेशी नागरिकांचे अनधिकृत वास्तव्य,त्याच फरार आरोपींचा शोध या अनुषंगाने पनवेल पोलीस मोठ्या प्रमाणात रात्रीच्या वेळी गस्त घालत आहेत. यात अनेक प्रकारच्या कारवाया सुरू असून मागील काही दिवसांपासून देशातील बिघडलेली स्थिती याबाबत अधिक सतर्क राहून संशयित आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असेलल्या नागरिकांना ताब्यात घेण्याचे काम सुरू आहे.
यावेळी पनवेल शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी माहिती देताना नागरिकांना कारवाई सोबत रात्रीच्या वेळी नागरिकांना अधिक सुरक्षित वाटावे म्हणून कोंबिग ऑपरेशन सुरू असून पुढील काळात असेच सुरू राहणार असल्याचे सांगितले.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली