कल्याण शीळ मार्गावरील वाहतूक कोंडीस अनधिकृत बांधकामे जबाबदार; वाहतूक विभागाने गेल्या दहा वर्षात या संदर्भात कोणताही पाठपुरावा केला नाही, माहिती अधिकारात धक्कादायक खुलासा
कल्याण शीळ रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी आहे. अनधिकृत बांधकामामुळे वाहतूक कोंडी होत आहे. वाहतूक नियंत्रण विभागाने केडीएमसीकडे गेल्या दहा वर्षात किती पत्र व्यवहार केला आहे याची माहिती मनसे पदाधिकारी अरुण जांभळे यांनी माहितीच्या अधिकारात वाहतूक शाखेकडे विचारली होती.
गेल्या दहा वर्षात अनधिकृत बांधकाम संदर्भात केडीएमसीकडे एकही पाठपुरावा वाहतूक विभागाने केला नाही, अशी माहिती कल्याण पूर्व येथील कोळशेवाडी वाहतूक शाखेने जांभळे यांना दिली आहे. वाहतूक कोंडीस जबाबदार असलेली बेकायदा बांधकामे हटणारच नसतील आणि यासाठी वाहतूक विभाग किंवा केडीएमसी प्रयत्न करत नसेल तर वाहतूक कोंडी कशी दूर होईल? असा सवाल मनसेच्या वतीने उपस्थित करण्यात आला आहे. याप्रकरणी मनसे पदाधिकारी जांभळे हे उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली