केडीएमसी हद्दीत आठ अनधिकृत प्राथमिक शाळा उघडकीस; टिटवाळ्यात सर्वाधिक सात बेकायदेशीर शाळा असल्याचे पालिकेच्या सर्वेक्षणात उघड

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

केडीएमसी हद्दीत आठ अनधिकृत प्राथमिक शाळा उघडकीस; टिटवाळ्यात सर्वाधिक सात बेकायदेशीर शाळा असल्याचे पालिकेच्या सर्वेक्षणात उघड

                                                                 LOKSANDESH  NEWS 



केडीएमसी हद्दीत आठ अनधिकृत प्राथमिक शाळा उघडकीस; टिटवाळ्यात सर्वाधिक सात बेकायदेशीर शाळा असल्याचे पालिकेच्या सर्वेक्षणात उघड


 कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शिक्षण विभागाने पालकांसाठी गंभीर इशारा दिला आहे. महापालिका हद्दीतील आठ प्राथमिक शाळा बेकायदेशीरपणे सुरू असल्याचे तपासणीत उघड झाले आहे. या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा प्रवेश घेऊ नये, असे आवाहन महापालिकेने केले असून, सर्वाधिक सात शाळा टिटवाळा परिसरातील आहेत.

मार्च महिन्यापासून शाळांमध्ये नव्या शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरू होत असते. याच पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शिक्षण विभागाने तपासणी मोहीम राबवली. या मोहिमेत आठ प्राथमिक शाळा शासकीय परवानगीशिवाय सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.या शाळांनी कोणतीही शासकीय मान्यता घेतलेली नसून, पालकांनी आपल्या मुलांचा प्रवेश या शाळांमध्ये घेऊ नये, असे आवाहन पालिकेचे उपआयुक्त संजय जाधव यांनी केले आहे. महत्त्वाचे म्हणजे या शाळांतील विद्यार्थ्यांचे जवळच्या मान्यताप्राप्त शाळांमध्ये समायोजन करण्यात येणार आहे. तसेच पालिकेची ही मोहीम अशीच सुरू राहणार असून यानंतर ही अशा शाळा निदर्शनास आल्या तर त्यांच्यावर देखील कारवाईचा इशार पालिकेने दिला आहे


शाळांची यादी:

एल.बी.एस. इंग्लिश स्कुल, बल्याणी टिटवाळा

सनराईज स्कुल, बल्याणी टिटवाळा

संकल्प इंग्लिश स्कुल, बल्याणी टिटवाळा

पूर्ण प्रज्ञा इंग्लिश स्कुल, बल्याणी टिटवाळा

पोलारिस कॉन्व्हेन्ट स्कुल, बल्याणी टिटवाळा

डी.बी.एस. इंग्लिश स्कुल, आंबिवली पश्चिम

ऑक्सफर्ड इंग्लिश स्कुल, आंबिवली पश्चिम

बुद्धीस्ट इंटरनॅशनल स्कुल, महाराष्ट्र नगर, डोंबिवली पश्चिम


लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली