जागतिक परिचारिका दिनानिमित्त परिचारिकांनी घेतली आरोग्य सेवेची शपथ
आज जागतिक परिचारिका दिन असून छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय येथील परिचारिकांनी हा दिन मोठ्या उत्साहात साजरा केला.
आज परिचारिका दिनानिमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय येथील सभागृहामध्ये 900 पेक्षा जास्त परिचारिका यांनी आरोग्यसेवेची शपथ घेतली असून रुग्ण सेवा मनोभावे करणार असून ज्या परिचारिकेने चांगले काम केले आहे त्यांना पुरस्कार सुद्धा मिळणार आहे प्रथम पुरस्कार म्हणून 51 हजार रुपये आणि द्वितीय पुरस्कार म्हणून 31 हजार रुपये असे यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय अधिष्ठता डॉक्टर शिवाजी सुक्रे यांनी सांगितले.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली.