LOKSANDESH NEWS
येवला बाजार समिती जिल्ह्यात द्वितीय क्रमांक सभापती सविता पवार यांचा
बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्प अंतर्गत वार्षिक क्रमवारीत येवला कृषी उत्पन्न बाजार समितीचा नाशिक जिल्ह्यातून दुसरा क्रमांक आला आहे. तर विभागात नववा व राज्यात 26 वा क्रमांक येवला कृषी उत्पन्न बाजार समितीने पटकावला आहे.
येवला कृषी उत्पन्न बाजार समितीला जिल्ह्यात दुसरा क्रमांक मिळाल्याने सभापती सविता पवार, उपसभापती संध्या पगारे यांच्या सह संचालक मंडळ व सचिव के आर व्यापारी यांनी समाधान व्यक्त केले आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली