LOKSANDESH NEWS
तलवार हातात घेऊन नाचल्यामुळे आमदार सिद्धार्थ खरात यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल
लोकप्रतिनिधीकडून शस्त्र प्रदर्शन ? चर्चेला उधाण
माजी प्रशासकीय अधिकारी असलेले आमदार सिद्धार्थ खरात यांचा एका लग्न समारंभात हातात तलवार घेऊन डीजेच्या तालावर नाचतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.हा प्रकार काल चिखली तालुक्यातील अमडापूर येथे एका लग्न समारंभात घडला होता. आता या प्रकरणात अमडापूर पोलीस स्टेशन मध्ये आमदार खरात यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सार्वजनिक ठिकाणी अशाप्रकारे शस्त्र प्रदर्शन कायद्यानुसार निषिद्ध आहे. त्यामुळे माजी प्रशासकीय अधिकारी आणि सध्या आमदार असलेल्या व्यक्तीकडून असा प्रकार घडल्याने अनेकांना आश्चर्य वाटत असून, आमदार खरात यांच्यावर टिका होत आहे. राज्यात यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. शिंदे गटाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी एका कार्यक्रमात तलवारीने केक कापल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. आता उबाठा गटाचे आमदार सिद्धार्थ खरात यांच्यावरही अमडापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली