महाराष्ट्र राज्य हज समिती सदस्य इरफान शेख यांची पत्रकार परिषद

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

महाराष्ट्र राज्य हज समिती सदस्य इरफान शेख यांची पत्रकार परिषद





 महाराष्ट्र राज्य हज समिती सदस्य इरफान शेख यांची पत्रकार परिषद


दरवर्षी जगभरातील अनेक जण सौदी अरेबिया येथील मक्का मदीना येथे हज यात्रा करिता जात असतात. मात्र, यंदा हज यात्रेला जाणाऱ्या ५२ हजार यात्रेकरू यांची यात्रा धोक्यात आलेली आहे. हज यात्रा करणाऱ्यांकडून आकारण्यात आलेले २६० कोटी सौदी सरकारला दिले नसल्याने प्रायव्हेट टूर कंपनीकडून जाणाऱ्या हज यात्रेकरूंना यंदा यात्रेला जाता येणार नाही. 

  तसेच महाराष्ट्र राज्य हज समिती यांनी पत्रकार परिषद घेत केंद्रीय हज कमेटीवर आरोप केले आहे. हज यात्रेसाठी जाणाऱ्या लोकांना योग्य न्याय मिळाला पाहिजे नाही तर येणाऱ्या काळात रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य हज समितीचे सदस्य इरफान शेख यांनी दिला आहे.


लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली