उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत चौथ्या ऑल इंडिया फेडरेशन कप कबड्डी स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत चौथ्या ऑल इंडिया फेडरेशन कप कबड्डी स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ

LOKSANDESH  NEWS 






 उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत चौथ्या ऑल इंडिया फेडरेशन कप कबड्डी स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ

 

 प्रो- कबड्डीच्या धर्तीवर अमरावतीमध्ये प्रथमच तीन दिवसीय चौथ्या ऑल इंडिया फेडरेशन कबड्डी कप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. देशभरातील नऊ राज्यातील पुरुष आणि महिलांचे कबड्डी संघ अमरावतीत दाखल झाले आहेत. अमरावती जिल्हा कबड्डी असोसीएशन व शोध प्रतिष्ठानचे आयोजन. एकाच मैदानात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर अमरावती येथील ऑल इंडिया फेडरेशन कप च्या भव्य आयोजनाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. ऑल इंडिया फेडरेशन कपचे उद्घाटन आमदार सुलभा खोडके यांच्या हस्ते झाले होते. या कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्रासह, राजस्थान, पंजाब, उत्तर प्रदेश, हरियाणा, गोवा, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, तामिळनाडू येथील महिला व पुरुषांचे कबड्डी संघ सहभागी झाले आहेत. यावेळी, आमदार सुलभा खोडके, इंटरनॅशनल कबड्डी फेडरेशनचे डायरेक्ट तेजस्विनी गेहलोत, कबड्डी फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष विभोर, भारतीय कबड्डी फेडरेशन अध्यक्ष जितेंद्र ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते.

 पुरूष गटात अंतिम सामन्यात राजस्थान विरुद्ध इंडियन रेल्वे यांच्यात थेट लढत झाली त्यात. इंडियन रेल्वे संघाने राजस्थान वर मात करून 24 गुणाने विजय मिळविला. तर महिलांच्या अंतिम सामन्यात हिमाचल प्रदेश विरुद्ध इंडियन रेल्वे यांच्यात अत्यंत चुरशीचा झालेल्या सामन्यात हिमाचल प्रदेश संघाने इंडियन रेल्वे  या संघावर 8 गुणाने विजय मिळविला. विजेत्या संघाला चौथ्या ऑल इंडिया फेडरेशन कबड्डी कप देऊन गौरविण्यात आले. उपविजेता संघाला ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. या तीन दिवसीय कबड्डी स्पर्धेला अमरावतीकरांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला.





लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली