वणीच्या कायर येथे २५०० वर्षादरम्यान च्या प्राचीन आणि समृध्द राजवटीचे मिळाले पुरावे

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

वणीच्या कायर येथे २५०० वर्षादरम्यान च्या प्राचीन आणि समृध्द राजवटीचे मिळाले पुरावे

            वणीच्या कायर येथे २५०० वर्षादरम्यान च्या प्राचीन आणि समृध्द राजवटीचे मिळाले पुरावे 


वणी जवळील कायर ही अतिशय प्राचीन काळापासून मानवी वस्ती राहिली आहे. येथे इतिहासपूर्व पाषाणयुगीन काळापासून ते सातवाहन आणि वाकाटक काळापर्यंतचा इतिहास पहायला मिळतो. प्रा सुरेश चोपणे गेल्या काही वर्षापासून परिसरात सर्वेक्षण आणि संशोधन करीत आहेत. 

 

त्यांच्या अभ्यासानुसार तिथे २५०० वर्षापूर्वीच्या काळातील पुरावे तसेच सातवाहन,  वाकाटक  काळात माती, दगड,आणि विटाचा ४००० फुट लांबीचा घेरा असलेला  मोठा किल्ला बांधण्यात आला होता. येथील लोक विटा, मातीची घरे बनवीत होते आणि ते कृषी आणि पशुपालक होते. त्यांचेकडे विविध सोने-चांदी-तांब्यांची आभूषणे होती.अशी माहिती पुरातत्व संशोधक प्रा सुरेश चोपणे ह्यांनी दिली.



 लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.