प्रीती बंड कार्यकर्त्यांसह शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश करणार
शिवसेना ठाकरे गटाच्या निष्ठावंत नेत्या प्रीती संजय बंड 2024 च्या विधानसभेच्या निवडणुकीत बडनेरा विभानसभा मध्ये ठाकरे गटाने उमेदवारी न दिल्याने अपक्ष निवडणूक लढवली त्यावरून नाराज झालेल्या प्रीती संजय बंड आता शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार हे निश्चित झाले आहे.
कारण निवडणूक झाल्यानंतर उद्धव ठाकरे मला विचारपूस करतील बोलावतील पण अस काही झालं नाही त्यावेळेची मी वाट पाहली पण ठाकरे गटाकडून मला कुठलाही कॉल आला नसल्याने मी माझे कार्यकर्ते नाराज झाले आपुलकीने विचारपूस केली जात नसेल तर तर काय फायदा ज्यांची मला अपेक्षा नव्हती त्याचा मला एक कॉल आला आणि आपलुकीने मला विचारपूस केली त्यांनी मला बोलावल होत त्यांना माझ्या कार्याची ओळख आहे त्यांनी मला कॉल करून जो मला आपलेपणा दाखवला तो उद्धव ठाकरेंकडून अपेक्षित होता पण तसं काही झालं नाही. उद्धव साहेब नेहमी माझ्यासाठी साहेब राहतील. मी जिथे असते तिथे मी निष्ठेने असते साहेब माझा मनात नेहमी राहणार आहे. कुठे तरी आज मी एकनाथ शिंदे गटात जात आहे. कुठे मी तिथे एक निष्ठेने राहणार आहे. आणि आज अमरावतीत शिवसेना शिंदे गटाचा मेळावा आहे त्यामध्ये मी व माझे कार्यकर्ते मोठ्या संख्येने प्रवेश करणार आहे.