खासदार बाळ्या मामा यांनी कशेळी ते अंजुर फाटा रस्त्याची केली पाहणी
भिवंडी कशेळी या रस्त्यावर अनेक नागरिकांच्या येणाऱ्या तक्रारीवरून खासदार बाळ्या मामा यांनी कशेळी ते अंजुर फाटा या रस्त्याची पाहणी केली असून या रस्त्यावर ठिकाणी ठिकाणी पाणी जमा होत असून त्याचा निचारा होण्यासाठी मेट्रोचे अधिकारी असतील पीडब्ल्यूडी चे अधिकारी असतील यांची बैठक घेण्यात आली असून यावेळी खासदार बाल्या मामा यांनी या रोडची अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली आहे.
पीडब्ल्यूडी अधिकारी, मेट्रोचे अधिकारी एम एम आर डी असो हे हात झटकण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांच्याकडून लिहून घेतला असून आणि या कामाला लवकरात लवकर सुरुवात करण्याची मागणी केली असून एकंदरीत काम करण्याची मानसिकता अधिकाऱ्यांमध्ये का नाही त्याचं मलाही उत्तर मिळत नाही आता मी जी पाहणी केली ते सर्व दाखवलं. अपेक्षा आहे काम करतील आपण पाहिल असेल काल्हेर ते अंजुर फाटा दरम्यान अनेक मोरया व नैसर्गिक नाले होते ते 90 टक्के बंद झाले असून पावसाळ्या दरम्यान हा रस्ता चार महिने बंद ठेवावा लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तात्काळ यावर उपाययोजना व्हाव्या या संदर्भात दोन दिवसांमध्ये संबंधित अधिकाऱ्यांची चर्चा केली असून काम चालू करण्याचे आश्वासन दिले असून आढावा बैठक घेण्यात आली होती. बिल्डरांकडून या नैसर्गिक नाले व मोऱ्या बंद करण्यात आल्याचा आरोप देखील खासदार बाळ्या मामा यांनी केला आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली