तरुणाच्या बॅगमधून लाखो रुपयांचा गांजा हस्तगत
- धुळे तालुक्यातील आर्वी शिवारात पोलिसांनी मध्यप्रदेशध्या एका तरुणाला ताब्यात घेतले. त्याच्या बॅगमधून दोन लाखांचा गांजा पोलिसांनी जप्त केला. हा गांजा इंदौर येथून घेवून कल्याण येथे पोहचविण्यात येणार असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.
मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर धुळे तालुक्यातील आर्वी शिवारातील एका हॉटेलच्या पुढे एक तरुण गाठीची वाट पाहत उभा असून, त्याच्याकडे काहीतरी संशयास्पद असल्याची माहिती धुळे तालुका पोलिसांना मिळाली. माहितीच्या आधारे पोलिसांनी सुमित खडसिंग ठाकरे रा. मध्यप्रदेश या तरुणाला ताब्यात घेत त्याच्याकडील बॅगेची तपासणी केली असता, त्यात 2 लाख रुपयांचा गांजा आढळून आला. या प्रकरणी पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, हा गांजा इंदौर येथील सौरभ ठाकूर याच्या मालकीचा असून तो कल्याण येथील एका व्यापाऱ्याला देण्यासाठी घेवून जात होता, असे त्याने पोलिसांना सांगितले. त्यानुसार, सुमित खडरिंग ठाकरे याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून, अधिक तपास पोलीस करीत असल्याची माहिती परिविक्षाधीन पोलीस उप-अधीक्षक सागर देशमुख यांनी यावेळी दिली.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली.