देसाईगंज तहसीलअंतर्गत येणाऱ्या कोंढाला-सींद्राई रेत घाटाचा अधिकृत उत्खनन कालावधी संपून देखील सध्या घाटावर अवैध रित्या रेती उपसा सुरू आहे. स्थानिक नागरिकांनी याबाबत अनेकदा तक्रारी करूनही महसूल प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त करण्यात येत आहे.
संबंधित रेत घाटाचा ठेका असलेल्या कंपनीचा अधिकृत टाईम पिरेड काही दिवसांपूर्वीच समाप्त झाला आहे. मात्र तरीही दररोज रात्रीच्या वेळेस अवैधपणे रेती वाहतूक सुरू असून, यामध्ये स्थानिक बड्या व्यक्तींचा सहभाग असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. प्रशासनाच्या डोळ्यासमोर ही अवैध हालचाल सुरू असूनही संबंधित विभाग शांत का आहे, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक नागरिक, पर्यावरणप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून जोर धरू लागली आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली.