सोलापुरात प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांचा ताफा आंदोलकांनी रोखला
- प्रहारचे शहर कार्याध्यक्ष खंडणी मागत असल्याचा आरोप करत एका मशीद ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी रोखला कडू यांचा ताफा
- प्रहारचे शहर कार्याध्यक्ष खालिद मनीयार खंडणी मागत, मशीदीची जागा हडप करत असल्याचा काळी मशीद ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप
- एकीकडे कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यासाठी ‘संताजी-धनाजी पुरस्कार’ देण्यासाठी बच्चू कडू हे सोलापुरात आले होते
- मात्र त्यांच्याच कार्यकर्त्यांच्या विरोधात मशीद ट्रस्टच्या पदाधिकऱ्यांनी गंभीर आरोप केलेत
- दरम्यान बच्चू कडू यांनी गाडीतून उतरून निवेदन स्वीकारले, तसेच योग्य दखल घेण्याचे आश्वासन ही दिले
- विशेष म्हणजे ज्या पदाधिकाऱ्याच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आलं ते खालिद मनियार हे बच्चू कडू यांच्या सोबतच होते