भाजप आणि शिवसेनेची युती पक्की आहे - मंत्री संजय शिरसाट

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

भाजप आणि शिवसेनेची युती पक्की आहे - मंत्री संजय शिरसाट

LOKSANDESH  NEWS 



                                  भाजप आणि शिवसेनेची युती पक्की आहे - मंत्री संजय शिरसाट



ON राष्ट्रवादी एकत्र 

- उबाठा गटाने जी काही युती केली होती ती चुकीची होती, हे आम्ही आधीच सांगत होतो. आणि आता त्याचा प्रत्यय आता त्यांना येत आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसवाले तुमच्या सोबत राहणार नाही, हे वारंवार आम्ही त्यांना सांगत होतो. आता जसेजसे त्यांचा भविष्य अंधारमय होत चालले आहे. तसे आता ते टीका करत आहेत. राष्ट्रवादीमधील फूट त्याला कौटुंबिक फूट मानली जाते,पण ते उद्या एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रत्येकजण आपापल्या पध्दतीने प्रतिक्रिया देत आहे. त्यांनी एकत्र येणे काही नवीन नाही. काँग्रेस देखील यांच्यासोबत कुठे आहे, गेल्या चार महिन्यात काँग्रेससोबत यांची कोणती बैठक झाली. कधी यांनी त्यांना फोन केला किंवा त्यांनी यांना फोन केला. पुढील काळात उभाठा गटाला एकटाच चालावे लागणार आहे. आता एकटाच प्रवास त्यांना महागात पडणार आहे. ते हिंदुत्वाशी एकरूप राहिले नाही, महाविकास आघाडीत जाऊन देखील महाविकास आघाडी एकत्र ठेवू शकले नाही. त्यांची आता घर का न घाट का अशी अवस्था झाली आहे.

- अजित पवार जातील की नाही माहित नाही, मी युतीबद्दल सांगत आहे. आम्हाला काय मिळणार हे आम्ही आता सांगू शकत नाही. त्यांचं एकत्र येणे हे दोघेही काहीतरी संकेत देत आहे. शरद पवार आमच्या सोबत येतील की, अजित पवार यांचा नेतृत्व करतील हे सगळे प्रश्न आहे. त्या राष्ट्रवादीचे नेतृत्व कोण करेल हा देखील एक प्रश्न आहे.

त्यांना एकत्र येऊ द्या त्यानंतर समीकरणे काय ठरतात हे ठरवू. भाजप आणि शिवसेनेची युती पक्की आहे त्यात कोणतेही मतभेद नाही.

मोठा भाऊ होईल छोटा भाऊ होईल, चंद्रबाबू नायडू आमच्यासोबत आले म्हणून त्यांच्यासोबत आमची युती झाली का? त्यांची प्रासंगिक काय युती आहे, त्याच्याशी आम्हाला काही देणंघेणं नाही.

- अजित पवारांना काय बोल मिळेल हे भविष्यात ठरेल

ON समाज कल्याण निधी

- कदाचित मला माझ्या खात्याची पूर्णपणे माहिती नसेल. ज्यांनी कोणी प्रतिक्रिया दिली असेल, त्यांना काही वाटत असेल तर त्यांनी माझ्याशी चर्चा करावी. मी त्याच उत्तर देईल. 

ON अजित पवार लाडकी बहीण योजना

- लाडकी बहीण बाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना त्यांनी घेतलेला निर्णय कायम राहील. त्यात आणखी काही बदल किंवा अपडेट करायचा असेल, तर त्याचं स्वागत आहे. पण त्यांना आज जे काही मिळत आहे त्यात कपात होणार नाही.

ON भारत पाकिस्तानबाबत बैठक

- आंतरराष्ट्रीय प्रश्न आहे. त्यावर मी बोलणं योग्य नाही. पण आज काय चर्चा होते, यावर भारताचा नवे तर जगाचे लक्ष लागल आहे. 

ON पालकमंत्री

- त्यांचे आपापसातले प्रेमाचे संबंध आहे. त्यामुळे त्यांच्या पालकमंत्री पदाचा निर्णय लवकर लावावा अशी सर्वांची इच्छा आहे.



लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली.