LOKSANDESH NEWS
येवल्यात सततच्या पावसाने कांद्याचा झाला चिखल
येवला शहरासह परिसरात भर उन्हाळ्यात देखील सतत होणाऱ्या अवकाळी पावसामुळे अंगणगाव येथील अल्ताफ मोहम्मद हसन या शेतकऱ्याचा संपूर्ण दीड एकर कांद्याचा पावसाच्या पाण्यामुळे चिखल झाल्याने अक्षरशः या शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.
सतत कोसळणाऱ्या पावसामुळे शेतात साठवलेला कांदा हा पूर्णपणे सडून गेल्याने नुकसान भरपाईची मागणी शेतकरी करीत आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.