LOKSANDESH NEWS
मल्लनिस्सारण योजनेमुळे शहरातील रस्ते खड्डेमय, सामाजिक कार्यकर्त्यांनी पोकलेन वर चढत केले काम बंद आंदोलन
अमृत अभियानाच्या अंतर्गत असलेल्या मल्लनिस्सारण योजनेमुळे धुळे शहरातले सर्वच महत्त्वाचे रस्ते मोठ्या प्रमाणात खोदत असल्याचं समोर आला आहे. मनपाच्या परवानगी शिवाय रस्ते खोदण्यात आल्याचा आरोप करत धुळे शहरातील वाडीभोकर रस्त्यावरील मल्लनिस्सारण योजनेचे काम सामाजिक कार्यकर्त्या व इंदिरा महिला मंडळाचे अध्यक्षा प्रभा परदेशी यांनी पोकलेन मशीन वर चढून बंद करीत जोरदार आंदोलन केले आहे.
वर्षभरापूर्वीच कोट्यावधी रुपयातून वाडीभोकर रोडवर सिमेंट काँक्रीटचा रस्ता तयार करण्यात आला होता. मात्र मल्लनिस्सारण योजनेमुळे या रस्त्याच खोदकाम करण्यात आलं. धुळे मनपाची कुठलीही परवानगी न घेता रस्त्याच खोदकाम करण्यात आल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्त्यांसह स्थानिक नागरिकांनी जोरदार आंदोलन केल. केलेल्या खोदकामा मुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे संबंधित कंत्राटदाराला वारंवार सांगूनही रस्ता बुजवण्याचे काम होत नसल्याने संतप्त झालेल्या प्रभा परदेशी यांनी स्थानिक नागरिकांना घेत पोकलेन मशीन वर चढत काम बंद आंदोलन केले.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.