चोपडा तालुक्यातून जाणारा ब-हाणपुर अंकलेश्वर महामार्गाची दुरावस्था
रावेर लोकसभा मतदारसंघातील केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मतदारसंघ असलेल्या चोपडा तालुक्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग बऱ्हाणपूर अंकलेश्वर या महामार्गावरील खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. चोपडा शहरापासून शिरपूर कडे जाणाऱ्या या महामार्गावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यातून अवजड वाहन व लहान गाड्या चालवणं कठीण जात आहे.
खड्ड्यांमध्ये पावसाचं पाणी साचल्याने गाडी कुठून टाकावी असा प्रश्न मे महिन्यात पडतोय पावसाळा सुरू झाल्यानंतर काय परिस्थिती होईल याची चिंता वाहन चालकांना सतावते. या महामार्गावर मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर झाला असला तरी या महामार्गावरील रस्त्याचा काम पाहिजे त्याप्रमाणे होताना दिसत नाही या महामार्गावरील खड्डे दुरुस्त करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी सामाजिक कार्यकर्त्यांनी वेळोवेळी आंदोलन केले आहे. तरी देखील पाहिजे त्या प्रमाणात बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गाचे काम होत नाही तसेच राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी हे देखील लक्ष देत नाहीये. या महामार्गाकडे दुर्लक्ष दिसून येत आहे केंद्रीय लोकप्रतिनिधींनी या बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावरील रस्त्यावरील खड्ड्यांची दुरुस्ती करण्यास अधिकाऱ्यांना व ठेकेदारांना सांगावे व गाडीच्या नुकसानी बरोबर आमचा मनस्ताप थांबवावा असे वाहन चालकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.