बुलढाण्यात पारधी विकास परिषदेचे बोंबाबोंब करत आक्रोश आमरण उपोषण
खामगाव तालुक्यातील लाखनवाडा येथे राहणाऱ्या गोपाल पवार या दहावीत शिकणाऱ्या युवकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी दरोडा घरफोडी सारख्या गुन्ह्यात संशयित म्हणून ताब्यात घेतले होते. व त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
मात्र गोपाल पवार वर महाराष्ट्रातील कुठेही गुन्हे दाखल नसून त्याच्या घरी रेशन दुकान, ट्रॅक्टर आणि स्वतः चालक आहे. गोपाल पवार वरील गुन्हे खारीज करण्यात यावे व दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी आज फासेपारधी विकास परिषदेने बुलढाण्यात आक्रोश आमरण उपोषण सुरू केले आहे. यावेळी गोपाल पवार यांच्या नातेवाईकांनी प्रशासनाविरोधात बोंबाबोंब आंदोलन केले आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली