महाराष्ट्र स्टेट बँक मित्राज असोसिएशनच्या वतीने विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन
महाराष्ट्र स्टेट बँक मित्राज असोसिएशन ए.आय.बी.इ.ए. शी संलग्न द्वारा महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉइज फेडरेशनच्या वतीने आज शहरातील माहत्मा फुले यांच्या पुतळ्यासमोर आज धरणे आंदोलन करण्यात आले. यात बँक आणि बँक मित्र यातील मध्यस्थ दूर करा, बँक मित्रांना वाजवी दराने कमिशन द्या, बँक मित्रांना मशीन, वाहन खर्च, डाटा जागा भाडे यांची भरपाई द्या, बँक मित्रांना मेडिकल, हॉस्पिटलचा खर्च भरपाई द्या, बँक मित्रांच्या इतर सर्व न्याय मागण्या मान्य करा, यासह विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करण्यात आले.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली