LOKSANDESH NEWS
माजी आमदार अनिल गोटे यांचे आरोप करण्याची ही जुनी सवय- अर्जुन खोतकर
धुळे गुलमोहर शासकीय विश्रामगृह सापडलेल्या रकमेच्या घटने प्रकरणी अंदाज समितीचे अध्यक्ष आमदार अर्जुन खोतकर यांनी सर्व आरोप फेटाळून लावले असून विरोधकांचा हा डाव असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.
आपला स्वीय सहाय्यक त्या रूम मध्ये राहत नव्हता तो बाजूच्या रूममध्ये राहत असल्याचे देखील स्पष्टीकरण अर्जुन खोतकर यांनी दिली आहे. माजी आमदार अनिल गोटे यांचे आरोप करण्याची ही जुनी सवय असल्याचे देखील प्रतिक्रिया अर्जुन खोतकर यांनी व्यक्त केली आहे.
सरकार ला आणि समितीला बदनाम करण्याचा विरोधकांचा डाव असल्याची आमदार अर्जुन खोतकर यांनी प्रतिक्रिया दिली.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली