भिवंडी महानगरपालिकेचे अधिकारी सुस्त नाही मस्त, नाले सफाई कामावर खासदार सुरेश म्हात्रे नाराज

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

भिवंडी महानगरपालिकेचे अधिकारी सुस्त नाही मस्त, नाले सफाई कामावर खासदार सुरेश म्हात्रे नाराज

LOKSANDESH  NEWS 





भिवंडी महानगरपालिकेचे अधिकारी सुस्त नाही मस्त, नाले सफाई कामावर खासदार सुरेश म्हात्रे नाराज


 भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील पावसाळा पूर्वीची नालेसफाई पूर्ण झाली नसल्याने अनेक सखल भागात पावसाळ्यात पाणी साचण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 


त्या पार्श्वभूमीवर भिवंडी लोकसभा खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी शहरातील नालेसफाई कामाचा आढावा घेतला आहे. यावेळी नाले सफाईच्या कामाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. या पाहणी दौऱ्यात स्थानिक नागरिकांनी सुद्धा बाळ्या मामा म्हात्रे यांच्याकडे पावसाळ्यातील नालेसफाईमुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीचे गाऱ्हाणे मांडले आहे. 

      येणाऱ्या पावसात पाणी साचून नागरिकांचे नुकसान होणार आहे. परंतु, याची तमा पालिका प्रशासन अधिकारी कर्मचारी यांना नाही, असा आरोप खासदार सुरेश म्हात्रे यांनी केला आहे. भिवंडी शहरातील परिस्थिती मागील कित्येक वर्षांपासून अशीच असून, नालेसफाई करणारे ठेकेदार पालिका कर्मचाऱ्यांच्या संगणमताने हा प्रकार होत असून, यावेळेस या कामात हलगर्जीपणा झाल्यास संबंधित उपायुक्त, आरोग्य विभागाचे अधिकारी यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कडक कारवाईची मागणी मी करणार आहे, असा इशारा खासदार सुरेश म्हात्रे यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे. सुरेश म्हात्रे यांनी नालेसफाई दरम्यान मंगळ बाजार स्लॅब, बाजारपेठ येथील नालेसफाईच्या कामाबाबत नाराजी व्यक्त केली असून तेथील स्थानिक दुकानदार नागरिक यांनी सुद्धा सुरेश म्हात्रे यांच्यासमोर या ठिकाणी समस्यांबाबतचे गाऱ्हाणे मांडले आहे.


लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.