LOKSANDESH NEWS
नवी मुंबईत आशियातील सर्वात मोठ्या कॅट शो चे आयोजन
नवी मुंबईतील सिडको एक्सिबिशन सेंटरमध्ये आशियातील सर्वात मोठ्या कॅट शो चे आयोजन करण्यात आले आहे. या कॅट शो मध्ये संपूर्ण भारतासह विदेशातून देखील एकूण एक हजार पेक्षा अधिक मांजर प्रेमींनी सहभागी घेतला होता.
या कॅट शो मध्ये 14 पेक्षा अधिक विविध प्रजातींच्या मांजरांचा सहभाग होता. ज्यामध्ये पर्शियन कॅट, बंगाल कॅट, बॉम्बे कॅट, हिमालयन कॅटचा प्रामुख्याने सहभाग होता. हा कॅट शो पाहण्यासाठी देशभरातून 10 हजार पेक्षा अधिक नागरिकांनी उपस्थिती दर्शवत कॅट शो चा आनंद लुटला. मांजरांविषयी जनजागृती करणे, मांजर प्रेमींसाठी एक व्यासपीठ उपलब्ध करणे हा या कॅट शो आयोजनाचा मुख्य उद्देश असल्याची प्रतिक्रिया यावेळी आयोजकांनी व्यक्त केली आहे.