४ बांधकाम व्यावसायिकांविरुद्ध नाशिकच्या भद्रकाली पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

४ बांधकाम व्यावसायिकांविरुद्ध नाशिकच्या भद्रकाली पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल

 



४ बांधकाम व्यावसायिकांविरुद्ध नाशिकच्या भद्रकाली पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल


 फ्लॅट विक्री करताना माहिती पत्रकात दाखविलेल्या सोयी-सुविधा न पुरविल्याने, तसेच कॉर्पस फंड घेऊनही सोसायटी स्थापन न केल्याने चार बांधकाम व्यावसायिकांविरुद्ध नाशिकच्या भद्रकाली पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. भारतीय डाकसेवा विभागात विकास अधिकारी म्हणून कार्यरत अभिजित वानखेडे यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. विनोद मदनलाल तलवार, चंद्रा विनोद तलवार, सुनील देवीसहाय गुप्ता, कविता सुनील गुप्ता असं गुन्हा दाखल झालेल्या बांधकाम व्यवसायकांच नाव आहे. हे सर्व मुंबईत राहणारे आहेत. यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. 

 १३ मे २०१३ ते २० जून २०२४ या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडल्याचे वानखेडे यांनी तक्रारीत म्हटले आहे. ते कर्मा गॅलक्सी अपार्टमेंटचे चेअरमन म्हणून काम पाहतात. त्यांच्यासह एकूण १६३ फ्लॅटधारकांनी २०१३ ते २०२४ या कालावधीत मे. मेसर्स कर्मा, कर्मा रियल्टी गॅलक्सी अपार्टमेंटमध्ये भागीदार असलेल्या संशयित चौघांकडून फ्लॅट खरेदी केले. त्यावेळी या १६३ जणांकडून संबंधित संशयितांनी कॉर्पस फंड म्हणून २ कोटी २६ लाख ४० हजार ४०० रुपये घेतले. परंतु ठरल्याप्रमाणे सोसायटी स्थापन केली नाही. याशिवाय प्रोजेक्टच्या माहिती पत्रकात दर्शविण्यात आलेल्या काही सोयी-सुविधा न पुरविता कॉर्पस फंडामधील सव्वादोन कोटींहून अधिक रक्कम स्वतःच्या फायद्याकरिता वापरून वानखेडे व अन्य फ्लॅटधारकांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार पोलिसांनी फसवणुकीसह अन्य कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली