उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पुतळा जाळून रिपब्लिकन पार्टी वतीने निदर्शने करण्यात आली

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पुतळा जाळून रिपब्लिकन पार्टी वतीने निदर्शने करण्यात आली



           उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पुतळा जाळून रिपब्लिकन पार्टी वतीने निदर्शने करण्यात आली 


 लाडकी बहिण योजनेसाठी समाज कल्याण विभागाचा तब्बल ४१० कोटी रुपयांचा निधी परस्पर वळवल्यामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र चांगलीच आक्रमक झाली आहे. छत्रपती संभाजी नगर शहरातील सामाजिक न्याय विभागासमोर रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्राच्या वतीने निदर्शने करण्यात आली. 

परस्पर निधी वळवल्यामुळे एससी एसटी विद्यार्थ्यांचे मोठ्या नुकसान झालं आहे. अर्थमंत्री अजित पवार हे जाणीवपूर्वक दलित समाजावर अन्याय करतात. यामुळे त्यांचा पुतळा जाळून आम्ही निषेध केला आहे. येत्या सात दिवसात लाडकी बहीण योजनेसाठी वर्ग केलेला ४१० कोटी रुपयांचा निधी सामाजिक न्याय विभागाला परत करावा. अन्यथा आम्ही याप्रकरणी न्यायालयात दात मागणार आहे.


लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली