बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश, २०० पोलीस एकाचवेळी पोहोचले, १०० जणांना ताब्यात

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश, २०० पोलीस एकाचवेळी पोहोचले, १०० जणांना ताब्यात

                                                                LOKSANDESH  NEWS 




                बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश, २०० पोलीस एकाचवेळी पोहोचले, १०० जणांना ताब्यात


पुण्यातील खराडी येथे सायबर फसवणुकीसाठी चालवल्या जाणाऱ्या बोगस कॉल सेंटरवर पोलिसांनी छापा टाकला. या ठिकाणी अमेरिकन नागरिकांना 'डिजिटल अटक'च्या नावाखाली फसवलं जात होतं. यामध्ये १०० जणांना ताब्यात घेण्यात आलयं. पुणे पोलिसांनी खराडी मध्यरात्री धाड टाकत पोलिसांनी ही कारवाई केली. खराडी येथे अद्यापही कारवाई सुरू आहे. २०० पोलिसांचा फौजफाटा सध्या तिथे उपस्थित आहे. आतापर्यंत १०० जणांना ताब्यात घेण्यात आलयं मोबाईल, लॅपटॉप आणि इतर साहित्या जप्त करण्यात आलय. 

पुण्यातील खराडी परिसरातील प्राईड आयकॉन इमारतीत चालणाऱ्या बनावट कॉल सेंटरवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मध्यरात्री छापा टाकून सायबर फसवणुकीचे मोठे रॅकेट उघडकीस आणल. मॅग्नेटल बी पी एस अँड कन्सल्टन्सी एलएलपी नावाच्या या कॉल सेंटरमधून अमेरिकेतील नागरिकांना 'डिजिटल अटक'च्या नावाखाली फसवून लाखो रुपये उकळण्याचा प्रकार सुरू होता. या कारवाईत १०० हून अधिक जणांना पकडण्यात आल  यामध्ये अनेक तरुणींचा समावेश आहे.पोलिसांनी ४१ मोबाईल, ६१ लॅपटॉप आणि इतर महत्त्वाचे साहित्य जप्त केले आहे.आहे.पोलिसांनी ४१ मोबाईल, ६१ लॅपटॉप आणि इतर महत्त्वाचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.





लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./