डोंबिवलीत दत्तनगरात क्लस्टर योजना राबविण्याची शिवसेना आमदार राजेश मोरे यांची मागणी
कल्याण डोंबिवलीत क्लस्टर योजना राबवावी हे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वप्न आहे. डोंबिवली पूर्वेतील दत्तनगर परिसरात साडे तीन एकर मोकळ्या जागेवर क्लस्टर योजना राबविण्यात यावी अशी मागणी शिवसेना आमदार राजेश मोरे यांनी केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांच्याकडे केली. आज आमदार मोरे यांनी आयुक्त गोयल यांची भेट घेतली. आमदार मोरे यांनी केलेल्या मागणीनुसार आजपासून सर्वेक्षणाला सुरुवात केली जाणार असल्याचे आश्वासन आयुक्त गोयल यांनी आमदार मोरे यांना दिले असल्याची माहिती आमदार मोरे यांनी आयुक्तांच्या भेटीपश्चात दिली आहे.
मी एमआयडीसी परिसरात दोन दिवसापूर्वी नाल्यांची पाहणी केली असता. अतिशय निकृष्ट दर्जाचे काम कंत्राटदाराने केले आहे. नालेसफाई असेल. नाल्यात टाकलेले र’बीट असेल. या प्रकरणी उद्योग मंत्री उदय सामंत यांना पत्र दिले आहे. जे कोणी कामात हलगर्जीपणा दाखवित आहेत. मग ते एमआयीडीसीचे अधिकारी असोत किंवा कंत्राटदार असू देत. त्यांच्यावर कडक कारवाई करावी. पावसाळा जवळ आला आहे. नाले कधी भरण्याची शक्यता आहे. लोकांच्या घरात पाणी जाऊ शकते. त्यामुळे उद्योगमंत्र्याकडे मागणी केली आहे. संबंधित कंत्राटदार आणि कामात हलगर्जी करणारे एमआयडीसीचे अधिकारी यांच्यावर कारवाई करावी.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली